महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सागर : राहतगढ धबधब्याजवळ पिकनिकला गेलेल्या कुटुंबातील 5 जण बुडाले

सागर शहरातील इटवारी परिसरातील रहिवासी नासिर खान आपल्या कुटुंबासमवेत मंगळवारी रहाटगड भागात धबधब्याच्या ठिकाणी सहलीला गेले होता. कुटुंबातील सर्व सदस्य धबधब्याच्या पाण्यात आंघोळ करत होते. अचानक ते खोल पाण्यात गेल्यामुळे ही दुर्घटना घडली.

By

Published : Nov 18, 2020, 7:03 PM IST

सागर धबधबा दुर्घटना न्यूज
सागर धबधबा दुर्घटना न्यूज

सागर / भोपाळ - मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात राहतगढधबधब्याच्या ठिकाणी सहलीला गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

सागर येथील धबधब्याजवळ पिकनिकला गेलेल्या कुटुंबातील 5 जण बुडाले

हेही वाचा -मध्य प्रदेशात पिकअप वाहनाचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

सागर शहरातील इटवारी परिसरातील रहिवासी नासिर खान आपल्या कुटुंबासमवेत मंगळवारी रहाटगड भागात धबधब्याच्या ठिकाणी सहलीला गेले होता. कुटुंबातील सर्व सदस्य धबधब्याच्या पाण्यात आंघोळ करत होते. अचानक ते खोल पाण्यात गेल्यामुळे ही दुर्घटना घडली. येथील धबधब्याखाली असलेल्या कुंडात बुडून या सर्वांचा मृत्यू झाला. येथे सहा जण बुडाले होते. मात्र, यातील एका लहान मुलीला वाचवण्यात यश आले आहे. ही मुलगी सध्या गंभीररीत्या जखमी असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे.

मुख्यमंत्री चौहान यांनी सरकारी तरतुदींनुसार पीडित कुटुंबीयांना मदत-सहाय्य देण्याचे निर्देश सागर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर, मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थनाही केली आहे.

हेही वाचा -मध्य प्रदेश : बैतूलमध्ये लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक पुलावरुन खाली कोसळला, 6 ठार

ABOUT THE AUTHOR

...view details