नवी दिल्ली - केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर दिल्ली-हरियाणा सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांनी ( farmers agitation at Singhu on Delhi Haryana border ) परतीची तयारी सुरू केली आहे. आंदोलन स्थळावर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी तंबू हटविण्यास ( Farmers start removing tents ) सुरुवात केली आहे. एका शेतकऱ्याने घरी परतण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, अंतिम निर्णय ( Samyukt Kisan Morcha on farmers movement ) संयुक्त किसान मोर्चा करेल, असेही सांगितले आहे.
देशातील शेतकऱ्यांनी 26 नोव्हेंबर 2020 पासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Law) शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला एक वर्ष उलटले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीपुढे सरकारने झुकत कृषी कायदे रद्द ( Farm Laws Repealed) करण्याची घोषणा केली. मात्र, जोपर्यंत संसदेत कृषी कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली होती.
हेही वाचा-#1YearOfFarmersProtest : जाणून घ्या शेतकरी आंदोलनाचा प्रवास...तब्बल 700 शेतकऱ्यांचा आंदोलनात मृत्यू
गेल्या वर्षात आंदोलनादरम्यान तब्बल 700 शेतकऱ्यांचा ( Deaths in farmers agitation ) मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवर चालणारे शेतकरी आंदोलन ( Farmers Protest ) कमालीचे चर्चेत राहिले आहे. यामध्ये पोलिसांचा लाठीचार्ज, ट्रॅक्टर रॅली ( Tractor Rally ) आणि त्यानंतर झालेला हिंसाचार, हिंसाचारानंतर शेतकऱ्यांची माघारी वाटचाल, मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत ( Rakesh Tikait ) यांच्या अश्रूंनी शेतकरी आंदोलनाला पुन्हा दिलेली धार तसेच तरलखीमपूर खिरी घटना ( Lakhimpur Khiri Incident ) , या सर्व घटनांमुळे केंद्र सरकावर विरोधकांनी टीका केली होती.
हेही वाचा-Farm Laws To Be Rolled Back : कृषी कायदे रद्द: पाहा, कोण काय म्हणाले?
काय होते कृषी कायदे आणि शेतकऱ्यांचा आक्षेप -