महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Go To Home By Helicopter : 'मला हेलिकॉप्टरने घरी जाऊ द्या!', त्रस्त शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे अजब मागणी

हातात खेळण्यातील हेलिकॉप्टर असलेल्या एका शेतकऱ्याने हेलिकॉप्टर घरी उतरवण्याची परवानगी मिळावी यासाठी धर्मापुरी जिल्हाधिकारी कार्यालयात याचिका दाखल केली आहे. (permission to go to home by helicopter)

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 12, 2022, 9:31 PM IST

धर्मपुरी (तामिळनाडू) : धर्मापुरी जिल्ह्यातील बेननगरमजवळील शेतकरी के. गणेशन (57) आज धर्मापुरी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्यासाठी आले होते. या शेतकऱ्याने आपली समस्या सर्वांना कळावी म्हणून लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने याचिका केली. (permission to go to home by helicopter). तक्रार दाखल करायला आलेल्या त्यांच्या मुलींनी हातात एक खेळण्यातील हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टरचे चित्र धरले होते. (permission to go to home by helicopter in Tamil Nadu).

शेजाऱ्यांनी घरी जाण्याचा रस्ता अडवला : याबाबत बोलताना शेतकरी गणेशन म्हणाले, "माझ्या घराजवळील लोकांनी माझ्या घरी जाण्यासाठी मी वर्षानुवर्षे वापरत असलेला रस्ता अडवला आहे. याशिवाय चारही बाजूंनी त्यांनी गतिरोधक बांधले आहेत. यामुळे मला स्वतःच्या घरी जाता आले नाही. आम्ही 4 महिन्यांहून अधिक काळ एका नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला असून घरी जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. याबाबत पोलीस विभाग, महसूल विभाग आदींकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. जमिनीवरून मी माझ्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे मला हेलिकॉप्टरने किंवा विमानाने जावे लागेल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी", असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details