महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Assembly Election Exit Poll : पंजाब मध्ये 'आप'ची सत्ता येण्याची शक्यता? जाणून घ्या अन्य राज्यांची स्थिती

पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले ( Assembly Election Exit Poll ) आहे. या एक्सिट पोलमधील अंदाजानुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Assembly Election Exit Poll
Assembly Election Exit Poll

By

Published : Mar 7, 2022, 8:00 PM IST

Updated : Mar 7, 2022, 8:58 PM IST

हैदराबाद - पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले ( Assembly Election Exit Poll ) आहेत. या एक्सिट पोलमधील अंदाजानुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या झंझावातासमोर समाजवादी पक्षाची सायकल पंक्चर झाल्याचे दिसत आहे.

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ चा अंदाज

संस्था भाजपा काँग्रेस आप एसएडी
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया 01-04 19-31 76-90 07-11
एबीपी - सी वोटर्स 07-13 22-28 51-61 20-26
चाणक्य 01 10 100 06
पी-मार्क 01-03 23-71 62-70 16-24

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०२२ चा अंदाज

संस्था भाजपा काँग्रेस बसपा सपा बाकी
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया
एबीपी - सी वोटर्स
पी-मार्क 240 4 17 140 2

उत्तराखंड विधानसभा निवडणुक २०२२ चा अंदाज

संस्था भाजपा काँग्रेस आप बाकी
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया
एबीपी - सी वोटर्स 26-32 32-38 00-02 03-07
पी-मार्क 35-39 28-34 00-03 00-03

मणिपुर विधानसभा निवडणुक २०२२ चा अंदाज

संस्था भाजपा काँग्रेस बाकी
पी-मार्क 27-31 11-17 11-23

गोवा विधानसभा निवडणुक २०२२ चा अंदाज

संस्था भाजपा काँग्रेस बाकी
पी-मार्क 13-17 13-17 04-10

कसा घेतात एक्झिट पोल?

एक्झिट पोल हा मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशी मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कोणाल मतदान केले, याबाबत विचारले जाते. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याची माहिती आधीच घेतली गेलेली असते.

कोणत्या संस्था घेतात एक्झिट पोल?

टुडे चाणक्य, एबीपी-सी-व्होटर, न्यूज18, इंडिया टुडे-एक्सिस, टाइम्स नाऊ-सीएनएक्स, न्यूज एक्स-नेता, रिपब्लिक-जन की बात, रिपब्लिक-सी-व्होटर, एबीपी ही माध्यम समुह आणि खाजगी संस्था एक्झिट पोल घेतात.

हेही वाचा -Assembly Election 2022 : युपी, गोवा आणि पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांची निवडणुकीतील कामगिरी काय, पाहा स्पेशल रिपोर्ट

Last Updated : Mar 7, 2022, 8:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details