नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे आज (शुक्रवार) पहाटे निधन झाले. सिन्हा हे १९७४च्या बॅचचे आयपीएस होते. पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरच्या श्वास घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ते ६८ वर्षांचे होते.
सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन; कोरोनाची झाली होती लागण
सिन्हा हे २०१२ ते २०१४ पर्यंत सीबीआयचे संचालक होते. यासोबतच त्यांनी आयटीबीपीचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे. तसेच, इतरही आणखी मोठी पदं त्यांनी सांभाळली होती.
सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन; कोरोनाची झाली होती लागण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिन्हा यांचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. सिन्हा हे २०१२ ते २०१४ पर्यंत सीबीआयचे संचालक होते. यासोबतच त्यांनी आयटीबीपीचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे. तसेच, इतरही आणखी मोठी पदं त्यांनी सांभाळली होती.
हेही वाचा :निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाने निधन