नवी दिल्ली - काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक कोणीही लढवू शकते, असे स्पष्ट केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी काँग्रेसचे शशी थरूर यांनाही हेच सांगितले आहे. थरूर यांना निवडणूक लढवायची असेल तर निवडणूक लढवता येईल अस सोनीया म्हणाल्या आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात माध्यमांमध्ये अन्य नावांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात अशोक गेहलोत हे प्रमुख नाव आहे.
काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यासाठी प्रत्येकजण स्वतंत्र आहे -सोनिया गांधी
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाबाबद भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, कोणतीही व्यक्ती पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास स्वतंत्र आहे. ( Congress President Election) थरूर यांना निवडणूक लढवायची असेल तर ते निवडणूक लढवू शकतात. शशी थरूर यांनी आदल्या दिवशी सोनिया गांधी यांची भेट घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशोक गेहलोत यांचेही नाव घेतले जात आहे.
थरून यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष निवडीपूर्वी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. मात्र, ते कोणत्या संदर्भात भेटले हे त्यांनी स्पष्ट केले नाही. लोकसभा सदस्य असलेल्या थरूर यांनी अशा वेळी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे, जेव्हा त्यांनी अलीकडेच अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार असून, 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस आणि झारखंडचे प्रभारी अविनाश पांडे यांनीही सोनिया गांधींची भेट घेतली. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना झारखंडमधील राजकीय घडामोडींची माहिती दिल्याचे समजते. काही आठवड्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना पैशांसह पकडण्यात आले होते. झारखंड सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाने केला आहे.