आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ज्यांच्यावर असेल देशाची नजर -
आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी
मुंबई - मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे आर्यन खानसह इतर आरोपींना आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अरबाज मर्चंटसाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. मात्र, या युक्तीवादाला अधिक वेळ लागल्याने न्यायालयाने जामीनावर गुरुवारी (दि. 28) पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतला.
पंतप्रधान मोदी आज 18 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत सहभागी होणार
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रुनेईचे सुल्तान हसनल बोलकिया यांच्या आमंत्रणावरून 18 व्या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना आसियान-भारत संमेलनातही भाग घेणार आहेत. या संघटनेत 10 आशियान देशांच्या सदस्यांशिवाय भारत, चीन, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि रशिया सामील आहेत. या संमेलनात समुद्री सुरक्षा व दहशतवादासह प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्यावर व समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. त्याच बरोबर
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू गोवा दौऱ्यावर
पणजी - उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू गोव्यात दाखल झाले आहेत. आज ते पेडण्यातील संत सोहिरोबनाथ महाविद्यालय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राज्यपाल ई श्रीधरन पिल्लई , मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपराष्ट्रपतीचें स्वागत केले. त्यांनतर ते पणजीतील राजभवन येथे दाखल झाले, सुरक्षेच्या कारणांस्तव त्यांच वास्तव्य राजभवन येथेच आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस.. आज आंदोलनात १७ संघटना सहभागी होणार
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर अशा अनेक मुद्यावर एसटी कामगार संयुक्त कृती समितीने बुधवारपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीत महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन यासह एकूण १७ संघटना गुरुवारी बेमुदत उपोषणात सहभागी होणार आहे.
गृहराज्य मंत्री सतेज पाटील आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर
अमरावती - गृहराज्य मंत्री सतेज पाटील आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील गुन्ह्याच्या प्रकरणांचा आढावा ते आपल्या दौऱ्यात घेणार आहेत.
काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या -
पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किरण गोसावी पसार.. महिला सहकाऱ्याला अटक
पुणे - आर्यन खान प्रकरणात मुख्य पंच असलेल्या किरण गोसावीवर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसापासून गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले जात असताना आज पुण्यातील कामशेत भागात किरण गोसावी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. पुणे पोलिसांची दोन पथके त्याचा शोध घेत आहेत.
वाचा सविस्तर - पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किरण गोसावी पसार.. महिला सहकाऱ्याला अटक