मुंबई -पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात 2006-07 संजय राऊत यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रा चाळच्या पुनर्विकासासाठी म्हाडा अधिकारी आणि इतरांसह बैठकांना आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दुसर्या बैठकीस हजेरी लावली होती. असा दावा ईडीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात केला आहे. संजय राऊत हे प्रवीण राऊतयांच्या मार्फत गोरेगाव सिद्धार्थ नगरच्या पुनर्विकासात थेट सहभागी होते. संकल्पनेच्या टप्प्यापासून ते कार्यान्वित होईपर्यंत त्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला होता असे देखील ईडीने म्हटले आहे.
संजय राऊतांविरोधात ईडीनं दाखल केलेलं पुरवणी आरोपपत्र आणि खुलासे करण्यात आले आहे ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांना आरोपी नंबर 5 म्हणून दाखवलेलं आहे. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनमध्येही संजय राऊत यांचा सक्रिय सहभाग होता तसेच प्रविण राऊतच्या माध्यमातून मुख्य सूत्रधार या नात्यानं संजय राऊतचं सारे व्यवहार करत असल्याचा दावा देखील ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.