महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

DRI seizes e cigarettes: डीआरआयने मुंद्रा बंदरातून 48 कोटींच्या ई-सिगारेट केल्या जप्त

गुजरातमधील मुंद्रा बंदरातून Mundra port डीआरआयच्या पथकाने चीनमधून आलेले दोन कंटेनर जप्त केले e cigarettes worth 48 crores seized आहेत. या कंटेनरमधून तब्बल ४८ कोटी रुपयांच्या ई- सिगारेट जप्त करण्यात आल्या DRI seizes e cigarettes आहेत.

DRI seizes e cigarettes worth 48 crores from Mundra port
DRI seizes e cigarettes worth 48 crores from Mundra port

By

Published : Sep 18, 2022, 12:11 PM IST

कच्छ ( गुजरात ) :डीआरआयच्या पथकाने कच्छमधील मुंद्रा बंदरात Mundra port चीनचे दोन कंटेनर अडवले. तपासादरम्यान एका कंटेनरमध्ये 2,00,400 ई-सिगारेटच्या काड्या e cigarettes worth 48 crores seized सापडल्या. त्याची अंदाजे किंमत 48 कोटी रुपये आहे. दुसर्‍या कंटेनरमध्ये चुकीच्या पावत्या आढळल्या. दोन्ही कंटेनरचे बिल बदलून दुबईला पाठविण्याचे प्रयत्न सुरू होते.

सुरत आणि अहमदाबाद डीआरआयचे आणखी एक संयुक्त ऑपरेशन यशस्वी झाले आहे. चीनहून मुंद्रा बंदरात आलेल्या एका कंटेनरमध्ये संशयास्पद सामग्री असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे अधिकाऱ्यांनी तपास केला. झडतीदरम्यान कंटेनरमधून २,००,४०० ई-सिगारेटच्या काड्या सापडल्या. तसेच दुसऱ्या कंटेनरमध्ये चुकीचे घोषणापत्र आढळून आले.

काही दिवसांपूर्वी मुंद्रा बंदरातून सोडण्यात आलेल्या कंटेनरमधून सुरतजवळून मोठ्या प्रमाणात ई-सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता. केंद्रीय तपास यंत्रणांनी कच्छमधील कांडला आणि मुंद्रा बंदरांवरही तपास केला. भारताने यापूर्वीच ई-सिगारेटच्या आयातीवर बंदी घातली आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details