महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Spicejet : स्पाईसजेटवर कडक कारवाई, पुढील आठ आठवडे फक्त अर्धी उड्डाणे चालवण्याचे आदेश

DGCA ने स्पाईसजेट या विमान कंपनीवर कडक कारवाई केली ( action on spicejet ) आहे. एजन्सीने स्पाईसजेटला पुढील 8 आठवड्यांसाठी फ्लाइटची संख्या निम्म्या करण्याचे आदेश दिले ( SPICEJET WILL OPERATE ONLY 50 PERCENT SERVICE ) आहेत. डीजीसीएच्या कठोर पध्दतीचे कारण म्हणजे स्पाइसजेटमधील तांत्रिक त्रुटी आहेत.

By

Published : Jul 27, 2022, 7:16 PM IST

Spicejet
स्पाईसजेट

नवी दिल्ली :नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी स्पाइसजेट विमान कंपनीवर कडक कारवाई केली ( action on spicejet ) आहे. स्पाइसजेट वारंवार नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. स्पाईसजेट विश्वसनीय सेवा प्रदान करण्यात अयशस्वी झाले आहे. त्यामुळे कंपनीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अनेकदा आल्या आहेत त्रुटी :डीजीसीएने सांगितले की स्पाईसजेटला पुढील आठ आठवडे फक्त 50 टक्के उड्डाणे चालवावी ( SPICEJET WILL OPERATE ONLY 50 PERCENT SERVICE ) लागतील. अलीकडच्या काळात स्पाइसजेटमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. डीजीसीएने आपल्या आदेशात म्हटले आहे की, स्पाइसजेट अनेक पॅरामीटर्स पूर्ण करू शकत नाही.

विमानांमध्ये तांत्रिक दोष :स्पॉट चेकिंग दरम्यान त्रुटी आढळल्या. सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूक सेवा सुरू राहावी म्हणून स्पाइसजेटविरोधात पावले उचलली जात असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या 20 दिवसांत स्पाइसजेटच्या आठ विमानांमध्ये तांत्रिक दोष आढळून आले आहेत.

हेही वाचा :Air travel safety: भारतातील हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

ABOUT THE AUTHOR

...view details