महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली पोलिसांनी प्लाझ्मा दात्यांसाठी स्थापन केली ‘डिजिटल डाटा बँक’

रक्तदात्यांना आणि प्लाझ्मा उपचार करणार्‍यांसाठी ‘डिजिटल डाटा बँक’ स्थापन केली आहे. यासाठी 'जीवनरक्षक' नावाचा एक ऑनलाईन गुगल फॉर्म तयार केला आहे. दिल्ली पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर हा फार्म उपलब्ध आहे.

दिल्ली पोलीस
दिल्ली पोलीस

By

Published : Apr 25, 2021, 6:12 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी रक्तदात्यांना आणि प्लाझ्मा उपचार करणार्‍यांसाठी ‘डिजिटल डाटा बँक’ स्थापन केली आहे. यासाठी 'जीवनरक्षक' नावाचा एक ऑनलाईन गुगल फॉर्म तयार केला आहे. दिल्ली पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर हा फार्म उपलब्ध आहे.

गुगल फार्ममध्ये संभाव्य प्लाझ्मा दात्याला नाव, वय, लिंग, वैवाहिक स्थिती, आजार, संपर्क, स्थान, रक्त गट, कोविड मधून बरे होण्याची तारीख, सोशल मीडिया हँडल यासह इतर तपशील देणे आवश्यक आहे. तसेच प्लाझ्मा शोधणाऱ्या रूग्णाला नाव, वय, लिंग, रुग्णांचा मोबाईल क्रमांक, काळजीवाहूचे नाव, रुग्णालयाचे नाव, रुग्णालयाचे रूग्ण आयडी, हॉस्पिटलचे ठिकाण, रक्तगट व डॉक्टरांच्या नोंदी हा तपशील भरणे आवश्यक आहे. दिल्ली पोलीस या आकडेवारीवर नियंत्रण ठेवतील. प्लाझ्मा प्राप्तकर्त्यांकडे प्राप्त झालेल्या विनंत्या तपासण्यासाठी एक गट नियुक्त केला जाईल आणि योग्य देणगीदाराच्या उपलब्धतेवर प्राप्तकर्ता आणि देणगीदाराची माहिती त्यांच्यामध्ये नोंदवली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details