हैदराबाद -कोरोनावर भारत बायोटेकने लस तयार केली आहे. ही लस कोरोनावर प्रभावी ठरली आहे. याचे परिणाम देखील दिलासादायक आहेत. ही बाब पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या चाचणीच्या निष्कर्षांमधून समोर आली आहे.
कोवॅक्सिन विकसित करणार्या हैदराबाद स्थित कंपनीने पुण्यातील आयसीएमआर संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या सहकार्याने नुकतेच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात केली आहे. पण या चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी अद्याप घेण्यात आलेली नाही. दरम्यान, पुढील वर्षी कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात लसीचे साठवणूक तसेच लसीकरणाबाबचा आराखडा तयार करण्याचे निर्देश आहेत.
दिल्ली -
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. दिल्ली सरकारने कोरोना काळात जे काही काम केले आहे, याची चर्चा यूपीच्या गल्लीबोळात होत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अदित्यनाथ यांनी यूपीमध्ये सर्वाधिक कोरोना चाचणी घेण्यात आल्या असल्याचा दावा केला आहे. यात त्यांनी यूपीमधील कोरोना पॉझिटिव्ह दर आणि मृत्यू दर कमी असल्याचं सांगितलं आहे.
महाराष्ट्र -
मुंबई -केंद्र सरकारने कोरोना लस नागरिकांसाठी मोफत दिली पाहिजे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी व्यक्त केले आहे. यासोबत त्यांनी केंद्र सरकारने जर लस मोफत दिली नाही तर आम्ही राज्यात ही लस मोफत देण्याबाबत विचार करू, असे देखील टोपे यांनी सांगितलं आहे.