महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात गेल्या २४ तासांमध्ये ९१ हजार कोरोना रुग्णांची नोंद; ३,४०० जणांचा मृत्यू

काल नोंद झालेल्या रुग्णांनंतर देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ कोटी, ९२ लाख, ७४ हजार ८२३ झाली आहे. तसेच, आतापर्यंत देशात एकूण ३ लाख, ६३ हजार ७९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये १ लाख, ३४ हजार ५८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

corona-virus-india-tracker
देशात गेल्या २४ तासांमध्ये ९१ हजार कोरोना रुग्णांची नोंद; ३,४०० जणांचा मृत्यू

By

Published : Jun 11, 2021, 12:02 PM IST

नवी दिल्ली :देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता कमी होताना दिसून येत आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण अजूनही चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ९१ हजार ७०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, एकूण ३,४०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

काल नोंद झालेल्या रुग्णांनंतर देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ कोटी, ९२ लाख, ७४ हजार ८२३ झाली आहे. तसेच, आतापर्यंत देशात एकूण ३ लाख, ६३ हजार ७९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये १ लाख, ३४ हजार ५८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर देशातील एकूण कोरोनामुक्त लोकांची संख्या २ कोटी, ७७ लाख, ९० हजार ७३ झाली आहे. तर, सध्या ११ लाख, २१ हजार ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात काल एकूण २० लाख, ४४ हजार १३१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२ लाख, ७४ हजार ६७२ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यनिहाय कोरोना आकडेवारीसाठी येथे क्लिक करा..

ABOUT THE AUTHOR

...view details