महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Corona Deaths : काल सर्वाधिक 6 हजार 148 लोकांचा मृत्यू, अजूनही दुसरी लाट ओसरली नसल्याचा पुरावा

तज्ञांच्या मते लॉकडाऊनमुळे देशातील कोरोना संक्रमणाचा प्रभाव कमी होत आहे. तसेच रोजचा कोरोना मृत्यूचा आकडाही कमी होऊन ३ हजारांवर आला आहे. परंतु, काल देशातील सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. काल दिवसभरात कोरोनाने तब्बल ६,१४८ लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचे दिसून येत आहे.

Corona Deaths
Corona Deaths

By

Published : Jun 10, 2021, 2:09 PM IST

Updated : Jun 10, 2021, 3:16 PM IST

नवी दिल्ली :जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोनाचा कहर पसरला आहे. यातच दुसऱ्या लाटेचा प्रसार कमी होत असल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. तसेच नविन कोरोनाबाधितांचा आकडाही कमी होत आहे. परंतु, काल देशातील सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. काल तब्बल ६,१४८ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. हा देशभरातील आकडा आहे. महाराष्ट्रात २६१ जणांचा मृत्यू झाला तर १०,९८९ लोकांना काल कोरोनाची लागण झाली.

आत्तापर्यंतची देशाची कोरोना आकडेवारी

भारतात 94,052 इतक्या नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एकूण 2,91,83,121 एवढे कोरोना सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी 6,148 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकून कोरोना मृत्यूसंख्या 3,59,676 एवढी आहे. तर काल 1,51,367 एवढे कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असुन, आतापर्यंत 2,76,55,493 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 11,67,952 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात 33,79,261 एवढ्या लोकांचे लसीकरण झाले आहे. तर देशात आतापर्यंत एकून 24,27,26,693 इतक्या लोकांचे लसीकरण झाले आहे. देशात काल कोरोनाच्या 20,04,690 एवढ्या चाचण्या केल्या असून, कालपर्यंत एकून 37,21,98,253 एवढ्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

Last Updated : Jun 10, 2021, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details