महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 7, 2021, 5:00 PM IST

ETV Bharat / bharat

काँग्रेसच्या नेत्याची भाजप खासदार तेजस्वी सुर्यांसह तीन आमदारांविरोधात पोलिसात तक्रार

बंगळुरूच्या दक्षिण भागात असलेल्या कोविड वॉर रुममध्ये बेड अडविले जात असल्याचा भाजपच्या खासदार तेजस्वी सुर्यांसह तीन आमदारांनी दावा केला होता. मात्र, त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याचा आरोप केपीसीसीचे महासचिव सुर्या मुकुंद राज यांनी केला.

काँग्रेसची भाजप नेत्यांविरोधात तक्रार
काँग्रेसची भाजप नेत्यांविरोधात तक्रार

बंगळुरू-केपीसीसीचे महासचिव सुर्या मुकुंद राज यांनी भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या, आमदार रवी सुब्रमण्य, आमदार, उदय गुरदाचर आणि सतिष रेड्डी यांच्याविरोधात सिद्दपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. भाजच्या या खासदार व आमदारांनी सामाजिक तेढ वाढविणारे वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर करावी, असे केपीसीसीचे महासचिव सुर्या मुकुंद राज यांनी तक्रारीत म्हटले आहे.

बंगळुरूच्या दक्षिण भागात असलेल्या कोविड वॉर रुममध्ये बेड अडविले जात असल्याचा भाजपच्या खासदार तेजस्वी सुर्यांसह तीन आमदारांनी दावा केला होता. मात्र, त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याचा आरोप केपीसीसीचे महासचिव सुर्या मुकुंद राज यांनी केला.

सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करताना भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या

हेही वाचा-भिवंडीत ब्रश कंपनीमध्ये भीषण आग; 13 गोदामे जळून खाक

काय म्हटले आहे तक्रारीत?

त्या चार जणांनी सरकारी अधिकाऱ्यांबरोब सोशल डिस्टन्सिंग न पाळता वाद केला आहे. कोविड वॉर रुममध्ये २०५ लोक हे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. त्यापैकी १७ लोक एकाच धर्माचे आहेत. त्यांना सेवेत कसे घेतले हा प्रश्न खासदार तेजस्वी सुर्या आणि इतर तीन आमदारांनी कसा विचारला ? आमदार रवी सुब्रमण्यम म्हणाले होते, की मदरसा काय करत आहेत? हाजी यात्रेला पाठविण्याचे नियोजन करत आहेत का? यावरही काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा-अकलूज येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

17 कर्मचाऱ्यांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर करून भाजपच्या नेत्यांनी सामाजिक एकतेला धक्का पोहोविल्याचे काँग्रेसचे नेते सुर्या मुकुंद राज यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details