नवी दिल्ली - महागाईविरोधात राजधानी दिल्लीत आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi Arrest ), प्रियंका गांधी-वाड्रा ( Priyanka Gandhi Arrest ) यांना दिल्ली पोलिसांनी आज ताब्यात घेतले. या दोघांसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात Congress Leaders Detained घेतले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आज देशभरात आंदोलनास सुरुवात केली. राजधानी दिल्लीतून या आंदोलनाला प्रारंभ झाला.
संसद भवनासमोर आंदोलन -काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसद भवनासमोर काँग्रेस खासदारांनी आंदोलन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेसचे सर्व खासदार, कार्यकर्ते काळे कपडे घालून सरकारचा निषेध करीत होते. यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी राष्ट्रपती भवनाकडे कूच केले.
राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा - संसद भवनासमोर आंदोलन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी आपला मोर्चा राष्ट्रपती भवनाकडे वळविला. संसद भवन ते राष्ट्रपती भवन अशा खासदारांच्या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी हे करीत आहेत. तत्पूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सरकारवर घणाघाती हल्ला केला. काँग्रेसने 70 वर्षात देशासाठी जे कमावले ते भाजपच्या सरकारने 8 वर्षात गमावले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.