नवी दिल्ली -सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. शरद बोबडे यांचा कार्यकाल लवकरच संपणार आहे. त्यामुळे नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव मागविण्यात आली होती. त्यानंतर सरन्यायाधाशी बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली.
सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबर 2019 ला सेवानिवृत्त झाले होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. बोबडे यांचा कार्यकाळ 23 एप्रिल रोजी संपत आहे.