महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nitish Kumar Met Lalu Prasad Yadav: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्याच्या अगोदर घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू यादव यांची भेट घेतली आहे. (Nitish Kumar Met Lalu Prasad Yadav) राबरी निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्याच्या अगोदर घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्याच्या अगोदर घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट

By

Published : Sep 5, 2022, 3:17 PM IST

पटना -मुख्यमंत्री नितीश कुमारआज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी ते राबरी निवासस्थानी पोहोचले. जिथे त्यांनी राजद प्रमुख लालू यादव यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते. खरे तर विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट करण्यासाठी मुख्यमंत्री आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. जिथे ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. लालूंची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आमचे आपसातही तेच मत आहे. त्यामुळे आम्ही भेटत आहोत.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्याच्या अगोदर घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट

शरद पवार यांचीही भेट घेणार - आज संध्याकाळी नितीशकुमार आणि राहुल गांधी यांची भेट होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ते सोनिया गांधींना भेटणार होते. मात्र, त्यांच्या आईच्या निधनामुळे काँग्रेस सोनिया गांंधी देशाबाहेर आहेत. दरम्यान, नितीश कुमार 6 सप्टेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. ते सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊ शकतात. त्याच वेळी, 7 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचीही भेट घेणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पाटण्यात नितीश कुमार यांची भेट घेतली आहे.

अनेक पक्षांच्या नेत्यांसोबत विरोधी ऐक्य - दिल्लीत डाव्या पक्षांच्या नेत्यांसह मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटू शकतात. दिल्लीतील आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश यांची सपासह अनेक पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक होऊ शकते. नितीश कुमार यांनी यापूर्वीही अनेक पक्षांच्या नेत्यांसोबत विरोधी ऐक्याचा प्रयत्न केला होता. मुलायमसिंग यांना मोर्चाचे अध्यक्षही केले होते पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आता पुन्हा एकदा विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्न करत असून त्याअंतर्गत मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत.

हेही वाचा -Rahul Gandhi गुजरात हे ड्रग्जचं केंद्र बनलयं, पण भाजपा...; अहमदाबादमध्ये राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details