महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

India Bans You Tube Channels : केंद्र सरकारकडून 20 यूट्यूब चॅनल्सवर बंदी, फेक माहिती पसरवण्याचा आरोप

भारत विरोधी एजेंडा चालवण्याच्या आरोपाखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 20 यूट्यूब चॅनल्सवर ( You Tube channels ban ) बंदी घातली आहे. तसेच, मंत्रालयाने 2 वेबसाईट्सवर कारवाई देखील केली आहे. यातील बहुतांश यूट्यूब चॅनल पाकिस्तानातील आहेत. भारतविरोधी प्रचार करुन विशिष्ट एजेंडा चालवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

YouTube
यूट्यूब

By

Published : Dec 21, 2021, 7:05 PM IST

Updated : Dec 21, 2021, 7:25 PM IST

हैदराबाद -भारत विरोधी एजेंडा चालवण्याच्या आरोपाखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 20 यूट्यूब चॅनल्सवर ( You Tube channels ban ) बंदी घातली आहे. तसेच, मंत्रालयाने 2 वेबसाईट्सवर कारवाई देखील केली आहे. भारतीय गुप्तचर संस्था आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी आधी या चॅनेल आणि साईट्सची ओळख पटवण्यात आली. सरकारने बंदी घातलेल्या यूट्यूब चॅनेलमध्ये द पंच लाइन, इंटरनॅशनल वेब न्यूज, खालसा टीव्ही, द नेकेड ट्रूथ अशा चॅनेलचा समावेश आहे.

हेही वाचा -सौदी अरेबिया बदलत आहे.. पहिल्यांदाच रेव्ह पार्टी व संगीत फेस्टीव्हलचे आयोजन, वेस्टर्न पोशाखात महिलांचाहा डान्स

मध्यमांच्या वृत्तानुसार, गुप्तचर विभागाने या चॅनल्सविरोधात अहवाल सादर केला होता. सुत्रांनुसार, हे चॅनल्स ( 20 You Tube channels ban india ) आणि वेबसाईट्स पाकिस्तानकडून मार्गदर्शन घेऊन चालत होते आणि त्यांचा हेतू भारताविरोधात दुष्प्रचार करणे हा होता. भारतीय लष्कर, काश्मीर आणि अल्पसंख्याकांबद्दल चुकीची माहिती देण्याचे कार्य ते करत होते.

काय सांगतो मंत्रालयाचा अहवाल?

मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, या चॅनल्सचे 35 लाखांपेक्षा अधिक सब्सक्राईबर होते. त्यांच्या व्हिडिओंना 50 कोटींपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले होते. शेतकरी आंदोलन आणि सीएएविरुद्ध झालेल्या विरोधाला त्यावर अधिक तीव्रतेने दाखवण्यात आले होते. या अहवालानुसार, या चॅनल्सवर दिवंगत जनरल बिपिन रावत आणि राम मंदिर संदर्भात खोटी माहिती प्रसारित केली जात होती.

..या चॅनल्सवर घालण्यात आली बंदी

हिस्टोरिकल फॅक्ट, पंजाब व्हायरल, कवर स्टोरी, गो ग्लोबल, तैयब हनीफ, जेन अली ऑफिशियल, खालसा टीव्ही, द पंच लाईन, इंटरनॅशनल वेब न्यूज, द नेकेड ट्रुथ, न्यूज 24, 48 न्यूज, काल्पनिक, नया पाकिस्तान ग्लोबल, ई कॉमर्स, जुनैद हलीन ऑफिशियल.

हेही वाचा -OBC Reservation Case : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेचा केंद्राचा विचार

Last Updated : Dec 21, 2021, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details