नवी दिल्ली - इस्टोनिया, पॅराग्वे आणि डोमॅनिक रिपब्लिक या देशांत भारताचे राजदूत कार्यालय सुरू करण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. व्यापार आणि सांस्कृतीक संबंध घट्ट करण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
इस्टोनिया, पॅराग्वे देशात भारतीय राजदूत कार्यालय सुरू होणार
इस्टोनिया, पॅराग्वे आणि डोमॅनिक रिपब्लिक देशात भारताचे राजदूत कार्यालय सुरू करण्यास कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. व्यापार आणि सांस्कृतीक संबंध घट्ट करण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रकाश जावडेकर
सर्व देशांसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी भारताचा प्रयत्न
इस्टोनिया, पॅराग्वे आणि डोमॅनिक रिपब्लिक हे लहान देश असून या देशांसोबत भारताचे राजनीतिक संबंध मर्यादित होते. मात्र, आता या देशांमध्ये भारताचे मिशन कार्यालय म्हणजेच राजदूत कार्यालय सुरू होणार आहे. सर्व देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी मोदी सरकारने कायमच प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या देशांशी संबंध सुधारण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतल्याचे जावडेकर यांनी सांगितले.