महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र बेळगाव बस सेवा तात्पुरती बंद

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौंड गावात शुक्रवारी एका मराठी समर्थक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या मालकीच्या बसेस काळ्या शाईने रंगवल्याची घटना घडली. त्यामुळे खबरदारी म्हणून बेळगाव शहर मध्यवर्ती बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Maharashtra Karnataka Border Dispute).

By

Published : Nov 25, 2022, 7:25 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

बेळगाव (कर्नाटक): कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या सीमावादामुळे महाराष्ट्रातून बेळगावकडे येणाऱ्या ३०० हून अधिक बसेसची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. (Bus service from Maharashtra to karnataka). तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगाव शहर मध्यवर्ती बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Maharashtra Karnataka Border Dispute).

कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारी बस सुरू:महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौंड गावात शुक्रवारी एका मराठी समर्थक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या मालकीच्या बसेस काळ्या शाईने रंगवल्याची घटना घडली. त्यामुळे खबरदारी म्हणून बेळगाव शहर मध्यवर्ती बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्रातून कर्नाटककडे येणाऱ्या ३०० हून अधिक बसेस निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. बेळगाव, चिक्कोडीसह कर्नाटकातील अनेक भागांतून महाराष्ट्रातून दररोज बसेस धावतात. मात्र कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारी कर्नाटक परिवहन बस वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कन्नड समर्थक संघटनांना इशारा दिला आहे.

कर्नाटकातील 80 गावांवर महाराष्ट्राचा दावा - गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात सीमावाद सुरू आहे. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी एकमेकांना निवेदने दिली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की, महाराष्ट्रासोबत सुरू असलेल्या सीमावादावर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलावली जाईल. वादाच्या केंद्रस्थानी बेळगाव जिल्हा असून कर्नाटकातील 80 मराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राचा दावा आहे. महाराष्ट्राचे दावे फेटाळत सोलापूरसह महाराष्ट्रातील काही कन्नड भाषिक भाग कर्नाटकात विलीन करावेत, अशी कर्नाटक सरकारची मागणी आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये सध्या भाजपचीच सत्ता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details