महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bipin Rawat Helicopter Crash: पंतप्रधान मोदी, राहुल गांधी व शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून शोक व्यक्त, वाचा कोण काय म्हणाले

CDS Bipin Rawat passes away
CDS Bipin Rawat passes away

By

Published : Dec 8, 2021, 7:28 PM IST

Updated : Dec 8, 2021, 7:55 PM IST

19:48 December 08

देशासाठी आजचा दिवस खूपच दु:खद -अमित शाह

देशासाठी एक अतिशय दु:खद दिवस आहे कारण आम्ही आमचे CDS, जनरल बिपिन रावत जी यांना एका अत्यंत दुःखद अपघातात गमावले आहे. ते शूर सैनिकांपैकी एक होते, ज्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचे अनुकरणीय योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही. मला खूप दु:ख होत आहेत.

19:47 December 08

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देश विषण्ण - उद्धव ठाकरे

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला आहे. या शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

19:46 December 08

बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला -शरद पवार

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. त्यांची कारकीर्द अतिशय शौर्यपूर्ण होती आणि गेल्या चार दशकांतील त्यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या हार्दिक संवेदना.

19:45 December 08

कुन्नूर येथून देशासाठी अत्यंत दु:खद बातमी -ममता बॅनर्जी

कुन्नूर येथून अत्यंत दु:खद बातमी येत आहे. आज, संपूर्ण देश सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह हेलिकॉप्टरमध्ये असलेल्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो. तसेच जखमी झालेल्या सर्वांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.

19:44 December 08

देव कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो - नितीन गडकरी

कुटुंबीयांना हे कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्याची देव शक्ती देवो आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओम शांती

19:30 December 08

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बिपीन रावत यांना श्रद्धांजली

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण आपला पहिला सीडीएस जनरल बिपिन रावत यांना गमावले आहे. आपल्या शूर पुत्राच्या मृत्यूबद्दल भारत शोक करत आहे. रावत यांनी 43 वर्षे देशाची सेवा केली. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीसाठी केलेल्या सेवेचे आम्ही सदैव ऋणी राहू.

19:30 December 08

जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक व एक सच्चा देशभक्त -मोदी

जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक व एक सच्चा देशभक्त होते. त्यांनी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन सकारात्मक होता. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती.तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे, ज्यामध्ये आम्ही जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर कर्मचारी गमावले आहेत. त्यांनी अत्यंत तन्मयतेने भारताची सेवा केली. मी त्याच्या कुटूंबीयांच्या शोकात सहभागी आहे. असे ट्विट मोदींनी केले आहे.

18:53 December 08

या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे. मी जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ही एक अभूतपूर्व शोकांतिका आहे आणि या कठीण काळात आम्ही त्याच्या कुटुंबीयांच्या सोबत आहोत. या अपघातात प्राण गमावलेल्या सर्वांसर्वांबद्दलही मनापासून शोक. या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे.

18:50 December 08

जनरल बिपीन रावत यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांकडून दु:ख व्यक्त

देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व 14 जणांचा मृत्यू झाला यामध्ये सीडीएस बिपीन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा समावेश आहे.

Last Updated : Dec 8, 2021, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details