पाटणा (बिहार) : बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. खुद्द तेजस्वी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तेजस्वीने त्यांच्या नवजात मुलीचा फोटोही शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, देवाने कन्या रत्नाच्या रूपात मला भेटवस्तू पाठवली आहे.' यावेळी लालूंची कन्या मीसा भारती देखील रुग्णालयात उपस्थित होत्या.
आई आणि मूल दोघेही सुखरूप :यावेळीडॉक्टरांनी सांगितले की, आई आणि मूल दोघेही सुखरूप आहेत. तेजस्वी यादव यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, त्यांना फक्त मुलगी हवी आहे. त्यांच्या मते घरात मुलगी असणे चांगले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांची मुलगी देवाची भेट असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे राबडी देवी आपल्या सुनेच्या प्रसूतीपूर्वीच दिल्लीला पोहोचल्या होत्या. प्रेग्नेंसीदरम्यान तेजस्वी यांची पत्नी राजश्री दिल्लीतील तिच्या घरी होत्या. डॉक्टरांनी सांगितले की त्यांनी फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च महिन्यात प्रसूतीसाठी तारीख दिली होती.