भोपाळ ( मध्यप्रदेश ) : काही महिन्यांपूर्वी राजधानीत 4 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर NIA ने आणखी 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दोन्ही दहशतवाद्यांना रात्री उशिरा भोपाळच्या इटखेडी भागातून अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही बांगलादेशी दहशतवादी खास सॉफ्टवेअरच्या मदतीने तरुणांना ऑनलाइन जिहादी साहित्य पुरवायचे. हमीदुल्ला उर्फ राजू गाझी उर्फ मुफाकीर उर्फ समीद अली मियाँ उर्फ तल्हा आणि मोहम्मद सदाकत हुसेन उर्फ अबिदुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. दोन्ही आल्मी जब्लिगी इज्तिमामध्ये सहभागी होण्यासाठी भोपाळला आले होते, मात्र नंतर परतले नाहीत. (Allegation Of Serving Jihadi Literature From Internet Media) (Bhopal NIA) ( Bhopal NIA Arrested ) ( Bhopal 2 Suspected Terrorists Arrested ) ( Raid In Aishbagh Bhopal ) ( Bhopal Jihadi Literature )
ऑनलाइन सॉफ्टवेअरद्वारे धार्मिक साहित्य पोहोचवले जात होते : एनआयएच्या तपासात असे आढळून आले आहे की, अटक करण्यात आलेले दहशतवादी एका खास सॉफ्टवेअरच्या मदतीने तरुणांना जिहादी साहित्य पुरवायचे. हे असे सॉफ्टवेअर आहे, जे सहजासहजी पकडता येत नाही आणि सामान्य तपास यंत्रणांनाही ते पकडता येत नाही. यापूर्वी एनआयएने केलेल्या कारवाईदरम्यान त्याची लिंक सापडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर एकामागून एक लिंक जोडून ही टीम या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचू शकली.