महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एक बाई, 15 नवरे, 4 मुलांची आहे आई : 2 वर्षात बनली 15 वरांची वधू.. मधुचंद्राच्या रात्री करायची 'असं' काही

भोपाळ क्राईम ब्रँचने ( Bhopal crime branch police ) 2 वर्ष जुन्या तक्रारीवरून भोपाळमधील सीमा खान या महिलेला अटक केली ( bhopal police arrested robbery bride ) आहे. ही महिला चार मुलांची आई आहे. जिने नाव बदलून वेगवेगळ्या लोकांशी लग्न केले. ही महिला आतापर्यंत सुमारे 15 वरांची वधू बनली असून, या हनिमूनलाच हे वर फसवणुकीचे बळी ठरले ( bhopal Fraud marriage case ) होते.

bride
वधू

By

Published : May 25, 2022, 10:49 AM IST

Updated : May 25, 2022, 10:57 AM IST

भोपाळ ( मध्यप्रदेश ) :दोन वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोर नवरीला गुन्हे शाखा ( Bhopal crime branch police ) पोलिसांनी अटक केली ( bhopal police arrested robbery bride ) आहे. पूजा, रिया, रीना, सुलताना अशी या दरोडेखोर नववधूची अनेक नावे असून, ती गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांची दिशाभूल करून भोपाळमध्ये राहत ( bhopal Fraud marriage case ) होती. तिला यापूर्वीच चार मुलं आहेत. राज्यातील उज्जैन, जबलपूर, नर्मदापुरमसह अनेक जिल्ह्यांमध्येही तिच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. सीमा खान (वय ३२ ) असे दरोडेखोर वधूचे नाव असून, ती बुधवारा येथील रहिवासी असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या दरोडेखोर नववधूला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आता टोळीतील इतर सदस्यांची माहिती गोळा करत आहेत.

२ वर्षांपूर्वी गुन्हा दाखल : शाजापूर जिल्ह्यातील कालापिपल मंडी येथील रहिवासी कांताप्रसाद यांनी सीमा खानच्याविरोधात २ वर्षांपूर्वी तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून गुन्हे शाखा या दरोडेखोर नवरीचा शोध घेत होती. या दरोडेखोर नववधूने दलाल दिनेश पांडे नावाच्या तरुणामार्फत 85 हजार रुपये घेऊन पूजा उर्फ ​​रिया नाव असल्याचे सांगत कांताप्रसाद यांच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर 8 दिवसांनी दिनेश पांडे याने कांताप्रसाद यांना फोन करून पूजाच्या मेहुणीच्या ऑपरेशनची माहिती दिली. यानंतर दरोडेखोर नववधू पूजा घरातून 25 हजार रुपये आणि दागिने घालून भोपाळला आली. त्यानंतर ती पुन्हा परतली नाही. कांताप्रसाद भोपाळला पोहोचले तेव्हा कळले की तिने दुसरीकडे कुठेतरी लग्न केले आहे.

लुटारू नवरीने तिच्या टोळीसह लग्नाचे आमिष दाखवून अनेकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. लग्न झाल्यावर, हनिमूननंतर किंवा 8-10 दिवसांनी लग्न होऊन सासरी राहायचे आणि मग कुटुंबात कोणी आजारी असल्याच्या बहाण्याने पैसे गोळा करून निघून जायची.

शैलेंद्र चौहान, अतिरिक्त डीसीपी, गुन्हे शाखा

आजारपणाच्या नावावर पैशांची फसवणूक : या वधूच्या टोळीतील सर्व जण लग्नासाठी वराला तयार केल्यानंतर महिलेचे नातेवाईक बनत असत. कोरोनाच्या काळातही हे लोक गावोगावी जाऊन अशा लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत होते. ज्यांची काही कारणाने लग्न होत नव्हती. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून संबंध बनवायचे. यानंतर लग्नाचा खर्च आणि नातेवाईकांच्या आजारपणाच्या नावाखाली पैशांची फसवणूक सुरू झाली. पुरावे मिळू नयेत म्हणून मंदिरात लग्न लावून दिले. एवढेच नाही तर अनेकवेळा या लुटारू नववधूने पहिल्याच रात्री नवविवाहित पतीला फसवणुकीचा बळी बनवले. पहाटेपर्यंत ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने फरार होत असे. घरात असलेले दागिने आणि पैसेही ती सोबत घेऊन जायची. दोन वर्षांमध्ये या बाईने १५ जणांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे.

हेही वाचा : Froud Wedding : "गोष्ट एका खोट्या लग्नाची"... लाखो रुपये उकळून नववधूने ठोकली सिनेस्टाईल धूम

Last Updated : May 25, 2022, 10:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details