महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानमधील कोरोनाबाधित रुग्णाची क्वारंटाईन सेंटरमध्ये आत्महत्या

देचू ठाण्याअंतर्गत क्षेत्रातील ग्राम पंचायत देडा या गावातील सरकारी शाळेत क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. गुरुवारी सकाळी क्वारंटाईन सेंटरमधील एका खोलीत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संबधित युवक 9 दिवसांपूर्वी गुजरात येथून परतला होता. त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचा कोरोनाबाधित अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

youth-commits-suicide-at-the-wellness-center-of-dera-village-in-jodhpur
youth-commits-suicide-at-the-wellness-center-of-dera-village-in-jodhpur

By

Published : May 8, 2020, 8:58 AM IST

नवी दिल्ली - भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एका कोरोनाबाधित व्यक्तीने क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

देचू ठाण्याअंतर्गत क्षेत्रातील ग्राम पंचायत देडा या गावातील सरकारी शाळेत क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. गुरुवारी सकाळी क्वारंटाईन सेंटरमधील एका खोलीत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संबधित युवक 9 दिवसांपूर्वी गुजरात येथून परतला होता. त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचा कोरोनाबाधित अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

राजस्थानमधील कोरोनाबाधित रुग्णाची क्वारंटाईन सेंटरमध्ये आत्महत्या

याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून रुग्णाने कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे अद्याप निश्चित नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान राज्य सरकारने लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. लोकांना मदत करण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागने हेल्पलाईन क्रमांक जारी केला.

दरम्यान, कोरोना संशयित रुग्णालयातून पळाले, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, या सारख्या अनेक घटना घडल्याचे संपूर्ण देशातून पुढे येत आहेत. यातून कोरोनाबाबत जनजागृती होत असतानाही देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details