महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

औरंगाबादमधून ४ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली महिला मिळाली मध्यप्रदेशात; मुंबईत काढून घेतले होते रक्त

पीडिता औरंगाबाद सोडल्यानंतर मुंबई येथे पोहोचली. त्याठिकाणी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिला ताब्यात घेतले. त्यांनी अनेकदा तिचे रक्त काढून विकले. तिला वेगवेगळ्या कारणानी त्रास दिला.

By

Published : Aug 2, 2019, 9:23 PM IST

चार वर्षांपूर्वी औरंगाबादेतून बेपत्ता झालेली महिला सापडली मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये, मुंबईत काढून घेतले होते रक्त

भोपाळ - मध्यप्रदेशातील मंदसौर येथील एका समाजसेवी संस्थेने महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून पळालेल्या मानसिक रोगी महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. गेल्या ४ वर्षांपूर्वी पतीकडून छळ झाल्याने तिने घरातून पलायन केले होते.

चार वर्षांपूर्वी औरंगाबादेतून बेपत्ता झालेली महिला सापडली मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये, मुंबईत काढून घेतले होते रक्त

पीडिता औरंगाबाद सोडल्यानंतर मुंबई येथे पोहोचली. त्याठिकाणी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिला ताब्यात घेतले. त्यांनी अनेकदा तिचे रक्त काढून विकले. तिला वेगवेगळ्या कारणानी त्रास दिला. त्यामुळे ती त्यांच्या ताब्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करीत होती. त्यांच्या भितीने ती रेल्वेने वेगवेगळ्या शहरात प्रवास करीत होती. यावेळी ती अजमेरला जाण्यासाठी निघाली होती. मात्र, मंदसौर रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर जनकल्याण सेवा समितीच्या संचालिका अनामिका जैन यांच्यासोबत तिची भेट झाली. त्यांनी तिला जनकल्याण समितीच्या केंद्रात नेण्यात आले.

जनकल्याण समितीच्या सद्स्यांनी तिच्यावर उपचार केले. ठिक झाल्यानंतर तिने पूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने अनामिका जैन आणि महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी रविंद्र महाजन यांनी तिच्या कुटुंबीयांना शोधले. त्यानंतर मंदसौर येथे बोलावून शबानाला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details