महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशा : एक लाखाचे इनाम असलेल्या महिला माओवाद्याचे आत्मसमर्पण

पार्वती उर्फ रिंकी असे या २७ वर्षीय महिला माओवाद्याचे नाव आहे. तिच्या २ महिन्यांच्या बाळासह ती गुरुवारी पोलिसांकडे आली. ती मूळची छत्तीसगड येथील बीजापूरची असून तिने स्वतःजवळील शस्त्रांसह शरणागती पत्करली. तिने येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक सारावाना विवेक एम यांच्यासमोर सामान्य जीवन जगण्याची इच्छा व्यक्त केली.

महिला माओवाद्याचे आत्मसमर्पण

By

Published : Nov 8, 2019, 3:34 PM IST

रायगाडा - एक लाखाचे इनाम असलेल्या महिला माओवाद्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. तिच्या २ महिन्यांच्या बाळासह ती गुरुवारी पोलिसांकडे आली. पार्वती उर्फ रिंकी असे या २७ वर्षीय महिला माओवाद्याचे नाव आहे. ती मूळची छत्तीसगड येथील बीजापूरची असून तिने पोलिसांसमोर स्वतःजवळील शस्त्रांसह शरणागती पत्करली. तिने येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक सारावाना विवेक एम यांच्यासमोर सामान्य जीवन जगण्याची इच्छा व्यक्त केली.

ही महिला बन्साधारा-घुमासारा-नागावली डिव्हिजन या बंदी असलेल्या संघटनेच्या घुमारा दलमची सदस्य म्हणून काम करत होती. तिने ८ वर्षांपूर्वी माओवादी कारवाया करण्यास सुरुवात केली होती. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी होती. तिने माओवादी नेत्यांकडून महिलांना देण्यात येणाऱ्या वागणुकीला कंटाळून हा मार्ग सोडण्याचा निश्चय केल्याचे सांगितले. तसेच, माओवादी तत्त्वज्ञानावरून विश्वास उडाल्याचेही तिने सांगितले. माओवादी कारवाया करणाऱ्या महिला माओवादी नेत्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक शोषणाला बळी पडतात, असा आरोप तिने केला आहे. या महिलांना ना आदर मिळतो ना पुरुष सहकाऱ्यांकडून समानतेची वागणूक मिळते, असे तिने सांगितले.
पार्वती गर्भवती झाल्यानंतर ती कुठल्याही कामाची राहिलेली नसल्याने तिच्या पुरुष सहकाऱ्यांनी तिला सोडून दिले, असा आरोपही तिने केला आहे.पोलिसांनी तिला पुनर्वसनाची हमी दिली असून तिच्या २ महिन्यांच्या बाळाला ओडिशा सरकारकडून आत्मसमर्पणाच्या धोरणानुसार मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details