महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजधानी दिल्लीमध्ये महिलेवर अ‌ॅसिड हल्ला, आरोपी फरार

दिल्लीमध्ये एका महिलेवर आज (शनिवारी) अ‌ॅसिड हल्ला करण्यात आला आहे. अ‌ॅसिड हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

ACID ATATCK
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Dec 7, 2019, 4:59 PM IST

Updated : Dec 7, 2019, 6:06 PM IST

नवी दिल्ली -दिल्लीमध्ये एका महिलेवर आज (शनिवारी) अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. शहरातील गजबजलेल्या अजमेर गेट रेल्वे स्थानकावर हा हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये महिलांविरोधात हल्ले वाढत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.


अॅसिड हल्ला केल्यानंतर आरोपी घनटास्थळावरून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. महिलेला जखमी अवस्थेत लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोळ्याला गंभीर जखम झाल्याने पुढील उपचारासाठी गुरुनानक आय सेंटर येथे नेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Last Updated : Dec 7, 2019, 6:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details