नवी दिल्ली - बुलबुल चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं आहे. पश्चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशमधील खेपुपारा या भागाला बुलबुल या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी रविवारी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर चर्चा करून माहिती घेतली आहे.
पश्चिम बंगालमध्ये बुलबुल चक्रीवादळाचा कहर, मोदींनी दिले मदतीचे आश्वासन
बुलबुल चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं आहे. पश्चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशमधील खेपुपारा या भागाला बुलबुल या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.
बुलबुल' चक्रीवादळामुळे सार्वजनीक मालमत्तेचे नुकसनान झाले आहे. राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे परिस्थितीवर बारीक लक्ष असून मदतकार्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कोसळलेली झाडे रस्त्यांतून बाजूला सारण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून होत आहे.
शनिवारी राज्य सरकाराला हवामान खात्याने सतर्क केले होते. खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळावरील 12 तास बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान भारतातील पश्चिम बंगाल राज्याच्या किनारी भागातून १२० किमी प्रति तास वेगाने बुलबुल वादळ बांगलादेशच्या दिशेने जात आहे. त्यामुळे बांगलादेश सरकार आपत्तीपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी तयारीला लागले आहे.