महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हिंदू नागरिकांनाही अल्पसंख्यांकांसारखे लाभ मिळायला हवेत - विहिंंप

जेथे हिंदूंची संख्या कमी आहे, अशाठिकाणी त्यांना पूर्ण लाभ मिळायला हवा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने (विहिप) केली आहे.

विहिप सरचिटणीस सुरेंद्र सिंह

By

Published : Jun 13, 2019, 5:05 PM IST

नवी दिल्ली - ज्या राज्यात हिंदूंची लोकसंख्या कमी आहे, तिथे हिंदूना अल्पसंख्यांक समाजाचे लाभ मिळायला हवेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केली आहे.

विहिंपचे संयुक्त महासचिव डॉ. सुरेंद्र जैन यांनी ईटीव्ही भारतसोबत चर्चा करताना म्हटले आहे, की हिंदूंसोबत कोणताही भेदभाव होता कामा नये. जेथे हिंदूंची संख्या कमी आहे, अशाठिकाणी त्यांना पूर्ण लाभ मिळायला हवा. सरकारने नुकतेच ५ कोटी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये हिंदू विद्यार्थांचाही समावेश करण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये हिंदूंचे सर्वात जास्त शोषण होते. तिथे हिंदूंना संरक्षण मिळायले हवे. संविधानात कलम २९ आणि ३० नुसार जे लाभ अल्पसंख्यांकांना मिळतात तेच लाभ हिंदूंना मिळायला हवेत. यामुळे देशात समानतेचे वातावरण निर्माण होईल. आपले संविधान समता प्रदान करते. परंतु, याला मोठा विरोधाभास आहे याला दूर करणे आवश्यक आहे. यावर, कायदेपंडितांनी चर्चा केली पाहिजे आणि अल्पसंख्याकांना कोणतीही अडचण न ठरता सर्वसंमतीनुसार पुढची दिशा ठरवली पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details