नागापट्टीनम - तमिळनाडूमधील वेदरनायम गावामध्ये किरकोळ वादातून २ समाजादरम्यान वाद झाला होता. त्यातील एका गटाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेचे वृत्त पसरताच संपूर्ण नागापट्टीनमध्ये त्याचे पडसाद उमटले. दरम्यान प्रशासनाने 15 तासांच्या आतमध्ये त्या ठिकाणी नवीन पुतळा बसवला आहे.
तमिळनाडूमध्ये किरकोळ वादातून महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना; ४० जणांना अटक
तमिळनाडूमधील वेदरनायम गावामध्ये दोन किरकोळ वादातून २ समाजादरम्यान वाद झाला होता. त्यातील एका गटाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली.
शहरामध्ये कार अपघाताधून दोघांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसनामुळे समाजातील दोन गटांमधील वादाला सुरुवात झाली. त्यातील एका गटाने पोलीस ठाण्यासमोरील कारला आग लावून दिली. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. यावर दुसऱ्या गटाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली.
त्रिची झोन पोलीस महानिरीक्षक लोगनाथन यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी 750 पोलीस घटनास्थळी पाठवले. यामध्ये 40 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज सकाळी पोलीस महानिरीक्षक लोगनाथन यांनी 6 फूट उंच डॉ. आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी स्थापन केला आहे.