शहरातील कचरा टाकल्यामुळे उत्तराखंडमधील तेहरी जंगलाला आग
जिल्हा कारागृहाजवळ जंगलाला आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील कचरा टाकल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तेहरी - जिल्हा कारागृहाजवळ जंगलाला आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील कचरा टाकल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अग्निशामक दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेत आग नियंत्रणात आणली. या वेळी वन अधिकारीही उपस्थित होते.
'सध्या पावसाला उशीर झाला आहे. हे शहरातील कचरा येथे टाकला जाण्याचे मुख्य कारण आहे,' असे वन विभागाचे वनरक्षक आशिष दिमरी यांनी म्हटले आहे.
'साधारणपणे १५ फेब्रुवारी ते १५ जून हा जंगलांना आगी लागण्याचा काळ असतो. मात्र, त्यावेळेस हिमवर्षाव झाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये आगी लागल्या नाहीत,' अशीही माहिती त्यांनी दिली.