नवी दिल्ली - बिहारचे उपमुख्यमंत्री आणि बिहार विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारक सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (गुरुवार) दुपारी ट्विट करुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुशील कुमार मोदी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा नेत्यांसोबत प्रचार मोहिमेत सहभागी झाले आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना 'पॉझिटिव्ह'
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि बिहार विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारक सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
'कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, सर्व काही ठीक आहे. सुरुवातील थोडा ताप आला, मात्र, आता ताप नाही. मागील दोन दिवसांपासून खबरदारी म्हणून पाटणा एम्समध्ये भरती झालो आहे. फुफ्फुसाचे सीटी स्कॅन नॉर्मल आहे. लवकरच प्रचारासाठी येईन, असे ट्विट मोदी त्यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून मोदी यांनी बिहारमधील अनेक प्रचार सभांमध्ये सहभाग घेतला आहे. एनडीएच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची उठबस झाली असून १७ ऑक्टोबरला त्यांनी भबुआ जिल्ह्यात रोडशोत सहभाग घेतला होता. त्यामुळे आता एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. बिहारमध्ये २८ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होत आहे. तीन टप्प्यांत मतदान होणार असून १० नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.