महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शाहजहांपूर : एलपीजी सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे आग लागून महिलेचा मृत्यू

एलपीजी सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे एका घरात आग लागून एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, तिच्या कुटुंबातील सात जण भाजल्याने जखमी झाले. विमला असे या महिलेचे नाव असून ती रात्रीचे जेवण बनवत असताना सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आग लागली, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

By

Published : Oct 29, 2020, 5:29 PM IST

शाहजहांपूर
शाहजहांपूर

शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) - एलपीजी सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे एका घरात आग लागून एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, तिच्या कुटुंबातील सात जण भाजल्याने जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. निगोही पोलीस ठाणे परिसरातील गुरगवा गावात बुधवारी रात्री ही घटना घडली.

हेही वाचा -विणकरांच्या समस्येवर तोडगा काढा; प्रियांका गांधींचे योगी सरकारला पत्र

शहर पोलीस अधीक्षक संजय कुमार या दुर्घटनेविषयी अधिक माहिती दिली. सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आग लागल्यानंतर या महिलेला वाचवण्यासाठी तिच्या घरातील इतर लोक धावले. त्यांनी आग विझवून तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, गंभीर जखमी झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. विमला असे या महिलेचे नाव असून ती रात्रीचे जेवण बनवत असताना सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आग लागली.

या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच, जखमी झालेल्या सात जणांपैकी पाच जणांना पुढील उपचारांसाठी लखनऊ येथे हलविण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

हेही वाचा -हरियाणा तरुणी हत्या प्रकरण : तिसऱ्या आरोपीला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details