उन्नाव गँगरेप : पीडितेच्या अपघातप्रकरणी भाजप आमदाराविरोधात एफआयआर दाखल
सध्या पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या पीडितेची स्थिती धोक्याबाहेर आहे. तर, वकील अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत.
भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर
नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या चारचाकीला झालेल्या अपघातप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर, त्याचा भाऊ मनोज सिंग सेंगर आणि इतर ८ जणांविरोधात प्राथमिक तक्रार दाखल झाली आहे. पीडितेच्या गाडीला रायबरेली येथे अपघात झाला होता. यामध्ये अल्पवयीन पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले आहेत. तर, या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या पीडितेच्या काकूंसह आणखी एका नातेवाईक महिलेचा मृत्यू झाला आहे.