नवी दिल्ली -फ्रान्समधील जी-७ परिषदेत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर चर्चा केली. यावेळी दोघांमध्ये मैत्रीची छाप पाहायला मिळाली.
तुम्ही आम्हाला बोलू द्या. आम्ही दोघे बोलत राहू. जेव्हा गरज लागेल तेव्हा तुमची मदत मागितली जाईल. असे मोदी म्हणाले. त्यावर हे खुप चांगले इंग्रजी बोलतात. मात्र त्या भाषेमधून बोलत नाहीत, असे ट्रम्प यांनी म्हटले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हसत ट्रंम्प यांच्या हातावर जोरात टाळी मारली. हे पाहून तेथील सर्वजण हसायला लागले. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.