महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानातील राजसंमद येथील दोन बहिणी गाण्यातून करतायत कोरोनाविषयी प्रबोधन

राजस्थानातील राजसंमद येथील दोन बहिणी गाण्यातून प्रबोधन करत आहेत. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Two sisters of Rajsamand gave a message of rescue from Corona by singing a song
राजस्थानातील राजसंमद येथील दोन बहिणी गाण्यातून करतायत कोरोनाविषयी प्रबोधन

By

Published : Apr 3, 2020, 12:52 PM IST

राजसमंद- कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वांना घरीच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी प्रबोधनदेखील केले जात असून राजस्थानातील राजसंमद येथील दोन बहिणी गाण्यातून प्रबोधन करत आहेत. त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

राजस्थानातील राजसंमद येथील दोन बहिणी गाण्यातून करतायत कोरोनाविषयी प्रबोधन

राजस्थानातील राजसंमद जिल्ह्यातील कुंभलगड येथील दोन बहिणींनी गाण्यातून लोकांना घरामध्ये थांबण्याचे आवाहन केले आहे. या कवितेतून त्या दोघी लोकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे आवाहन करत आहेत. कुंभलगड येथील केलवाडामध्ये राहणाऱ्या या मुलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ईटीव्ही भारत या मुलींच्या कार्याला सलाम करत आहे. या मुलींच्या भावना लक्षात घेऊन आपण घरीच थांबावे, असे आवाहन देखील करत आहे.

राजस्थानात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून लोकांना घरी थांबण्याचे आवाहन करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details