महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ पर्यंतच्या ठळक बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ पर्यंतच्या ठळक बातम्या
Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ पर्यंतच्या ठळक बातम्या

By

Published : Jun 13, 2020, 9:00 AM IST

मुंबई :भारतीय सैन्य अकादमीचा परेड सोहळा आज होत आहे. महाराष्ट्रातील 18 जणांचा यात समावेश होता. आज (दि. 13 जून) भारतीय सैन्य अकादमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये 423 जवान सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये 330 भारतीय कॅडेट्स आणि 90 विदेशी कॅडेट्सचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक 66 उमेदवार उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 18 जवान आज पास आऊट होऊन भारतीय लष्करात सहभागी होतील.

सविस्तर वाचा - भारतीय सैन्य अकादमीचा परेड सोहळा आज, महाराष्ट्रातील 18 जणांचा समावेश

कुलगाम (जम्मू आणि काश्मीर) -दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि लष्करांना यश आले आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील कुलगाम जिल्ह्याच्या निपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळीच चकमक सुरू झाली. या चकमकीत पोलिसांनी २ दहशवतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली. सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे.

सविस्तर वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राजगुरुनगर (पुणे) - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा आजपासून सुरू होणार आहे. शनिवारी (दि. 13 जून) दुपारी चार वाजता माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान होणार आहे. हा सोहळा 50 जणांच्या उपस्थित पार पडणार आहे. तसेच आज(शनिवारी) पहाटे चार वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर घंटानाद, काकड आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती, पहाटपूजा करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - आषाढी वारी..! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात

पुणे- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करत आयोजित केलेल्या, इयत्ता अकरावी काॅमर्सच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली. आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी स्नेहवर्धक संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि संबंधित पर्यवेक्षक व परीक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी ही माहिती दिली.

सविस्तर वाचा - नियमांची पायमल्ली करत विद्यार्थ्यांची घेतली परीक्षा; 14 जणांवर गुन्हा दाखल..

बीड - राजकीय हेवेदावे विसरून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. इतरवेळी राजकारणात राजकीय व्यासपीठावरून एक दुसऱ्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे बीडचे मुंडे बहिण-भाऊ संकटकाळी एक दुसऱ्याची काळजी घेतात याचा प्रत्यय शुक्रवारी आला. बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजताच त्यांच्या बहिण पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत काळजी घेण्याबाबत सांगितले.

सविस्तर वाचा - बहिणीची माया.. पंकजा मुंडेंनी केली धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस

हरिद्वार - जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्या तसेच संशोधक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पतंजली ट्रस्टने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे.

सविस्तर वाचा - 'कोरोनावर लस शोधल्याचा पतंजलीने केला दावा'

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबईत शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. तसेच, 90 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, कोरोनाचे 1 हजार 372 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 55 हजार 357 वर तर, मृतांचा आकडा 2 हजार 42 वर पोहोचला आहे. मुंबईत आतापार्यंत 25 हजार 152 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने सध्या 28 हजार 163 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

सविस्तर वाचा - मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद, आकडा 2 हजार पार; 1372 नवे रुग्ण

नागपूर - मान्सूनचे विदर्भात आगमन झाले असल्याची घोषणा नागपूर वेध शाळेने केली आहे. विदर्भातील वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सविस्तर वाचा - विदर्भात मान्सूनचे दणक्यात आगमन, येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई- राज्यात कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून ऑनलाइन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र त्याला कडाडून विरोध सुरू होत असतानाच आज शालेय शिक्षण विभागाने शाळा जुलै महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा - BREAKING: शालेय शिक्षण विभागाची आडमुठी भूमिका; जुलैमध्ये होणार शाळांना प्रत्यक्ष सुरुवात

नवी दिल्ली -भारत- चीन सीमावादाची अधिकृत माहिती सरकारने नागरिकांसाठी खुली करावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपला केले आहे. मात्र, भाजपने राहुल गांधी यांचे एक जुने ट्विट शेअर करत टीका केली आहे. राहुल गांधी यांनी चीनी राजदुताची भेट घेतली होती, त्यासंबधीचे ट्विट केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शेअर केले आहे.

सविस्तर वाचा - भारत- चीन सीमा वादावरून रविशंकर प्रसाद यांनी शेअर केलं राहुल गांधीचं जुनं ट्विट, म्हणाले...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details