- मुंबई - दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. यावर्षी देखील स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अशीच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईमुळे भारतीय तिरंगा झेंड्यांच्या रंगात महापालिका मुख्यालयाची इमारत न्हाऊन निघाल्याचे दिसत आहे.
सविस्तर वाचा -स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई महापालिका मुख्यालयावर आकर्षक तिरंगी रोषणाई
- मुंबई - देश 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कोरोनाचा संसर्ग मात्र वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के आहे. शुक्रवारी १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर शुक्रवारी ३६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; 12 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद, 364 जणांचा मृत्यू
- शिमला :हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामधील गग्गल पोलीस ठाण्यामध्ये तब्बल १६ किंग कोब्र साप आढळून आले. एका किंग कोब्राने या १६ लहान कोब्रांना इमारतीतच जन्म दिला होता.
सविस्तर वाचा -पोलीस स्थानकात आढळले तब्बल १६ किंग कोब्रा, पाहा व्हिडिओ..
- नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे कौतूक केले. राम मंदिर, चीनबरोबरचा गलवान खोऱ्यातील संघर्ष, कोरोना काळात राबविण्यात आलेल्या सरकारच्या योजना आणि नव्या शिक्षण धोरणाचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
सविस्तर वाचा -'देश कोणत्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम, गलवानमधील घटनेनंतर स्पष्ट
- पुणे -पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करत असताना, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सविस्तर वाचा -संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाबाधिताला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या : अजित पवार
- नवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी 'निगेटिव्ह' आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. गुडगावमधील मेधांता या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. १२ दिवसानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.