महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 11, 2020, 1:33 PM IST

ETV Bharat / bharat

गुजरात : पापांपासून प्रायश्चित्त घेण्यासाठी आरोपीने पोलीस ठाण्यातच गायले भजन

हेमंत दवे सुरेंद्रनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध लोक कलाकार आहे. 8 जुलैला पोलिसांनी हेमंत आणि त्याच्या काही साथीदारांना जुगार खेळताना अटक केली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्याने पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी पोलीस ठाण्यात भजन गाण्याची परवानगी मागीतली.

हेमंत दवे भजप गायन करताना
हेमंत दवे भजप गायन करताना

अहमदाबाद-आपल्या पापांपासून प्रायश्चित्त मिळावं म्हणून एका आरोपीने थेट पोलीस ठाण्यातच भजन गायनाचा कार्यक्रम केला. जुगाराच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात येऊन भजन गायन केले. हा आरोपी स्थानिक लोक कलाकार असून आपल्या भजनांनी त्यानी पोलिसांची वाहवा मिळवली. ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात घडली.

पोलीस ठाण्यातील भजनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हेमंत दवे असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरिक्षकाच्या कक्षात हार्मोनियम वाजवत त्याने लोकगीते गायली. मुली तालुक्यातील पोलीस ठाण्यात 9 जुलैला ही घटना घडली. पोलिसांनीही त्याला पैसे बक्षिस देत गाण्यांची प्रशंसा केली.

हेमंत दवे सुरेंद्रनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध लोक कलाकार आहे. 8 जुलैला पोलिसांनी हेमंत आणि त्याच्या साथीदारांना जुगार खेळताना अटक केली होती. किरकोळ गुन्हा असल्याने त्याला जामीनही लगेच मिळाला. दुसऱ्या दिवशी हेमंतने पोलीस ठाण्यात येऊन पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी भजन गाण्याची विनंती केली. यास पोलिसांनीही परवानगी दिली.

हेमंत हा मोठा गुन्हेगार नाही. तो जामीनावर बाहेर असल्याने पोलिसांनी त्याला ठाण्यात भजन गाण्यास परवानगी दिली. त्याला फक्त आपल्या कृत्याचा खेद दाखवायचा होता. त्याला पोलिसांनी बोलविले नव्हते, असे जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक ए. बी. वलंद यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details