महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक... महिला तहसीलदाराला कार्यालयातच जिवंत जाळले

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र विजया यांचा जागीच मृत्यू झाला होता. विजया यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तहसीलदार कार्यालयातील दोन कर्मचारीही जखमी झाले, त्यामधील एकाची प्रकृती गंभीर आहे.

Abdullapurmet Tahasildar set on fire

By

Published : Nov 4, 2019, 6:24 PM IST

Updated : Nov 4, 2019, 7:22 PM IST

हैदराबाद -तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात असणाऱ्या अब्दुल्लापुरमेट तालुक्याच्या तहसिलदार विजया रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयातच जिवंत जाळल्याची घटना आज घडली. एका व्यक्तीने तहसिलदार कार्यालयात घुसून विजया यांच्यावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून दिले, त्यानंतर स्वतःलाही त्याने पेटवून घेतले.

या घटनेत विजया यांचा मृत्यू झाला, तर हल्लेखोराची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र विजया यांचा जागीच मृत्यू झाला होता. विजया यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तहसिलदार कार्यालयातील दोन कर्मचारीही जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये वेगाने पसरत आहे. तसेच, हे का घडले याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्कही लावले जात आहेत. हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरु आहे.

Last Updated : Nov 4, 2019, 7:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details