महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 15, 2019, 1:44 PM IST

ETV Bharat / bharat

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादवांच्या जामीन याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव डिसेंबर २०१७ पासून रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात बंद आहेत. त्यांनी प्रकृतीतील सतत होणारा बिघाड आणि अनेक आजारांचे कारण सांगून १० जानेवारीला बिहारच्या उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता.

लालू प्रसाद यादव (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली -चारा घोटाळ्याशी संबंधीत ३ प्रकरणांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरही न्यायालय सुनावणी करेल. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोईच्या अध्यक्षतेखाली असणारे पीठ लालू प्रसाद यादव यांच्या याचिकेवर सुनावणी करेल.

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव डिसेंबर २०१७ पासून रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात बंद आहेत. त्यांनी प्रकृतीतील सतत होणारा बिघाड आणि अनेक आजारांचे कारण सांगून १० जानेवारीला बिहारच्या उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर लालू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

लालू प्रसाद यादव यांना रक्तचाप, मधुमेह आणि अनेक आजार आहेत. त्यासाठी ते रांची येथील रिम्समध्ये उपचार घेत आहेत. यापूर्वी आयआरसीटीसी प्रकरणात त्यांना राबडी देवी आणि त्यांच्या पुत्रासह जामीन मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details