नवी दिल्ली -काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. आपणाला निवडणूक लढवता यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात त्वरित सुनावणीसाठी दाखल केलेली त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. २०१५मध्ये झालेल्या दंगलीत आरोपी असल्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही, असे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आगामी लोकसभा निडवणुकींमध्ये पाटिदार नेते हार्दिक पटेल निवडणूक लढवणार होते. त्यासाठी त्यांनी नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, निवडणूक लढवण्याचे त्यांचे हे स्वप्न सध्यातरी पूर्ण होणार नाही, असे दिसत आहे. ज्या व्यक्तीस २ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा सुनावण्यात आली असेल, अशा व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही.