महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विद्यार्थ्यांनी बनवले 'स्मार्ट हेल्मेट'; अपघाताचे ठिकाण समजणार

अपघात झाल्यावर होणाऱ्या हादऱ्याने हेल्मेटमधील सेन्सॅार कार्यान्वित होतो. त्यामुळे याची माहिती नातेवाईक, रुग्नवाहिका, पोलिसांना मिळते. त्यामुळे अपघात झालेल्या व्यक्तीला मदत मिळू शकणार आहे.

'स्मार्ट हेल्मेट

By

Published : Jul 14, 2019, 2:40 PM IST

कानपूर - आयआयटी कानपूर येथे सुरू असलेल्या हैकथॅानमध्ये चेन्नईच्या कारपागम अभियांत्रिकी कॅालेजच्या विद्यार्थांनी एक हेल्मेट बनवले आहे. अपघात झाल्यावर होणाऱ्या हादऱ्याने यातील सेन्सॅार कार्यान्वित होतो. त्यामुळे याची माहिती नातेवाईक, रुग्नवाहिका, पोलिसांना मिळते. त्यामुळे अपघात झालेल्या व्यक्तीला मदत मिळू शकणार आहे.

स्मार्ट हेल्मेट


यात एका साधारण हेल्मेटचा वापर करण्यात आला आहे. त्यामधे अनेक प्रकारचे सेन्सॅार आणि जीपीएस बसवला आहे. सोबत फोन नंबर ठेवण्यासाठी यात एक मेमरी बसवली आहे. अपघाताच्या हादऱ्याने यातील सेन्सॅार कार्यान्वित होतात आणि अपघाताचे ठिकाण नातेवाईक, रुग्नवाहिका, पोलिसांना समजते. त्यामुळे अपघात झालेल्या व्यक्तीला लवकर मदत मिळू शकणार आहे. यात एक पूश ऑनचे बटन दिले आहे. गाडी चालवताना ते ऑन करायचे आहे. अन्यथा यातील सेन्सॅार काम करणार नाही.

भारतार दर 4 मिनिटाला एक व्यक्ती अपघाताने मरण पावतो. त्यातील अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होतो. त्यामुळे वेळेवर उपचार मिळवण्यासाठी या स्मार्ट हेल्मेटचा उपयोग होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details