नवी दिल्ली- शहरातील जामिया मीलिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या एका विद्यार्थ्यांने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याने २ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेला नोटीस पाठविली आहे.
जामिया विद्यापीठ मारहाण प्रकरणातील विद्यार्थ्याने मागितली दोन कोटीची भरपाई
पोलिसांच्या मारहाणीत आपण जखमी झालो होतो आणि आपले दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. उपचारासाठी आपण २.५ लाख रुपये खर्च केले असून त्यापोटी मला २ कोटी रूपयांची भरपाई पाहिजे असल्याची मागणी शय्यान मुजिब या विद्यार्थ्याने याचिकेत केली आहे.
शहरातील जामिया मीलिया इस्लामिया विद्यापीठात १५ डिसेंबरला पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. पोलिसांनी विद्यापीठातील वाचनालयात शिरून आतमध्ये वाचन करणाऱ्या मुलांना काठ्यांनी चोपले होते. या मारहाणित आपण जखमी झालो होते आणि आपले दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. उपचारासाठी आपण २.५ लाख रुपये खर्च केले असून त्यापोटी मला २ कोटी रूपयांची भरपाई पाहिजे असल्याची मागणी शय्यान मुजिब या विद्यार्थ्याने याचिकेत केली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, केंद्रिय अन्वेषन विभाग आणि दिल्ली पोलिसांनी नोटीस पाठविली आहे.
हेही वाचा-अवैधरित्या सोने वाहतूक करणाऱ्या नौैकेवर नौदलाची कारवाई; ३.५ किलो सोने जप्त