महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीहून 25 हजार मुस्लीम बांधव होणार हज यात्रेसाठी रवाना

हज यात्रेसाठी दरवर्षी जगभरातील हजारो मुस्लीम बांधव मक्केला जातात. याचाच एक भाग म्हणून दिल्लीहूनही 25 हजार बांधव यात्रेसाठी रवाणा होणार आहेत.

By

Published : Jul 4, 2019, 2:35 PM IST

हज यात्रा

नवी दिल्ली - हजचा महिना सुरू झाला आहे. इस्लाममध्ये हज यात्रेचे खूप महत्त्व आहे. हज यात्रेसाठी दरवर्षी जगभरातील हजारो मुस्लीम मक्केला जातात. यावेळी दिल्लीहून 25 हजार मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी निघणार आहेत.


दिल्ली हज समितीने याची जबाबदारी घेतली आहे. सुमारे दीड हजार लोक दिल्लीमधील आहेत. बाकी यात्रेकरू इतर 6 राज्यांतील आहेत. यंदा देशभरातील तब्बल 12 हजार भाविकांना ग्रीन कॅटेगिरी मिळाली असून त्यांना मक्का येथील हरम शरीफजवळ राहण्याची संधी मिळणार आहे.


हज ही मुस्लीम लोकांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरात भरते. येथे हजचा फरीदा अदा केला जातो. जगभरातील मुस्लीम या दिवसापूर्वीच सौदी अरेबियातील मक्का येथे पोहोचलेले असतात. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुरानमध्ये आदेश आहे. ही एक पवित्र यात्रा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details