सहारनपूर- राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकझ या धार्मिक कार्यक्रमासाठी तबलिगी समुदायातील अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर हे अनुयायी देशातील इतर राज्यात प्रवास करत गेले होते. त्यातील काहींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांची संख्या जास्ती असल्यामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीने या प्रकरणाचे समर्थन केले आहे.
समाजवादी पार्टीचे प्रवक्ते संजय गर्ग यांनी यासंदर्भात 'ई टीव्ही भारत'ला खास मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी सरकारवर निशाणा साधत पार पडलेल्या तबलिगी कार्यक्रमाचे समर्थनच केले आहे.
देशात लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच हे सर्व अनुयायी इतर देशांमधून भारतात आले होते. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर या सर्वांना बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. तसेच हे अनुयायी धार्मिक प्रचारासाठी फिरत असतात. त्यामुळे हे असंवैधानिक नसून सरकार त्यासंदर्भात घेत असलेली भूमिका चुकीची असल्याचे संजय गर्ग यांनी सांगितले आहे. तसेच प्रसारमाध्यमदेखील यासंदर्भातली चुकीची माहिती देत असून सत्य परिस्थिती वेगळी असल्याचे गर्ग यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
समाजवादी पार्टीचे प्रवक्ते संजय गर्ग यांची विशेष मुलाखत पाहा....
समाजवादी पार्टीचे प्रवक्ते संजय गर्ग यांची विशेष मुलाखत पाहा....