महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'21 जूनला दिसणारे सूर्यग्रहण कुंडलाकार असेल'

देशभरामध्ये 21 जूनला दिसणारे सुर्यग्रहण हे कुंडलाकार असणार आहे. ग्रहण सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असून 2.20 मिनिटांनी संपणार आहे.

By

Published : Jun 20, 2020, 5:44 PM IST

सुर्यग्रहण
सुर्यग्रहण

भूवनेश्वर -देशभरामध्ये 21 जूनला दिसणारे सूर्यग्रहण हे कुंडलाकार असल्याचे शहरातील ‘पठाणी समंथा प्लॅनिटेरियम’चे उप संचालक एस. पटनाईक म्हणाले. संपुर्ण देशात आंशिक ग्रहण दिसणार आहे, तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा या तीन राज्यांना ग्रहण कुंडलाकार दिसेल, असे पटनाईक म्हणाले.

ग्रहण सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी सुरू होणार असून, 2.20 मिनिटांनी संपणार आहे. यावर्षी ग्रहण पाहण्यासाठी प्लॅनेटेरियममध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच ऑनलाईन कार्यक्रमही होणार नाही. कारण जास्त नागरिक पाहण्यास आले तर सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण होईल, असे पटनाईक म्हणाले.

ओरिसामध्ये ग्रहण दिसण्याची शक्यता 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तसचे ढगाळ वातावरणामुळे ग्रहण दिसण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ढग गेल्यानंतर ग्रहण पाहू शकता. ग्रहण पाहण्यासाठी नागरिकांनी सुरक्षा घ्यावी, असा सल्ला पटनाईक यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details