महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कांद्याचे भाव गगनाला भिडले; दरात लवकर घट न होण्याचे संकेत

नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी २ ते ३ महिन्यांचा अवधी लागेल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात आल्यानंतरच कांद्याच्या भाव उतार पाहायला मिळेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

कांद्याचे भाव गगनाला भिडले; दरात लवकर घट न होण्याचे संकेत
कांद्याचे भाव गगनाला भिडले; दरात लवकर घट न होण्याचे संकेत

By

Published : Oct 22, 2020, 9:30 PM IST

नवी दिल्ली - देशपातळीवरील कांद्याच्या भावात सध्या तेजी आहे. आगामी काळात कांद्याचे भाव कमी होतील, असे कुठलेही चित्र सध्या दिसत नाही. इंदोरमध्ये कांदा प्रतिकिलो १०० रुपये दराने विक्री होत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ही किंमत ३० टक्क्यांहून जास्त आहे.

कांद्याचे भाव गगनाला भिडले; दरात लवकर घट न होण्याचे संकेत

अतिवृष्टीमुळे कांद्याच्या वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्या. यामुळे भावामध्ये तेजी असल्याचे अनेकांचे मत आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी २ ते ३ महिन्यांचा अवधी लागेल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात आल्यानंतरच कांद्याच्या भाव उतार पाहायला मिळेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

यापूर्वी, केंद्र सरकारने १४ सप्टेंबर रोजी कांदा निर्यातबंदीची घोषणा केली होती. दरम्यान, बुधवारी केंद्राने कांद्यावरील आयात धोरणासंदर्भात शिथिलता केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details